न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२४) :- निविदेतील अटी व शर्तींमध्ये बदल करून शहरातील १० सार्वजनिक जलतरण तलावांचे खासगीकरण करण्यात आले आहे. अधिकारी व ठेकेदारांनी संगनमत करून तलाव मर्जीतील ठेकेदारांना दिले आहेत.
भविष्यात तिकिटाचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगीकरण रद्द करावे, अशी तक्रार साई सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज खान यांनी केली आहे. यासंदर्भात, त्यांनी आयुक्त शेखर सिंह आणि क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.
खान यांनी तक्रारीत म्हटले आहे की, संभाजीनगर, वडमुखवाडी, यमुनानगर, पिंपळे गुरव, भोसरी, पिंपरीगाव, सांगवी, कासारवाडी, नेहरूनगर आणि थेरगाव या १० जलतरण तलाव चालविण्यास देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली. मात्र, मूळ निविदेतील अटी व शर्तीमध्ये बदल करून मर्जीतील ठेकेदाराला तलाव चालविण्यासाठी दिले आहेत. त्यामुळे निविदा प्रक्रियेत पारदर्शकता दिसून येत नाही. अधिकारी व ठेकेदारांनी संगनमत करून ही प्रक्रिया राबविली आहे. तिकिटाचे दर वाढविले जातील. त्याचा आर्थिक भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांसह खेळाडूंना बसणार आहे. त्यामुळे ही रिंग करून राबविण्यात आलेली निविदा प्रक्रिया रद्द करावी.














1 Comments
tlover tonet
Hey, you used to write fantastic, but the last few posts have been kinda boring?K I miss your super writings. Past few posts are just a bit out of track! come on!