न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०१९) :- मुंबईमधील डीलरकडून आयफोन एक्स कंपनीचे ३५ मोबाईल आणि एमआय नोट्स ७ प्रो कंपनीचे ३० मोबाईल असे एकूण ६५ मोबाईल फोन दुकानात विक्रीसाठी मागवले होते. मात्र डिलिव्हरी बॉयने २७ लाख ८५ हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन घेऊन पलायन केले. ही घटना ८ एप्रिल ते २१ एप्रिल यादरम्यान पिंपरी येथे घडली.
अमित कुमार सुरेश कुमार जैन रा. गोरेगाव, वेस्ट मुंबई असे आरोपीचे नाव आहे. अमित हिरानंद आसवाणी वय २३, रा. पिंपरी यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
अमित आसवाणी हे पिंपरी चिंचवड मनपाचे माजी महापौर डब्बू आसवानी यांचे चिरंजीव आहेत. त्यांचे पिंपरीमधील साई चौकात पियुष मोबाइल कॅफे नावाने दुकान आहे.











