न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विषय समिती सदस्य पदाच्या निवडीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने अर्ज मागविले आहेत. समिती सदस्य पदासाठी इच्छुक नगरसेवकांनी लवकरात लवकर विरोधी पक्षनेता कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ३० अन्वये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विशेष समितीच्या सदस्य (विधी, शहर सुधारणा, महिला व बाल कल्याण व क्रीडा समिती) पदाच्या नियुक्त्या सोमवार (दि. २०) रोजी होणा-या महापालिका सभेत होणार आहेत.
त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इच्छुक सदस्यांनी या विशेष समित्यांच्या सदस्य पदासाठी (विधी, शहर सुधारणा, महिला बालकल्याण व क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती) त्यांनी लेखी अर्ज (दि. १७ मे) रोजी दु. ५ वाजेपर्यंत विरोधी पक्षनेता यांच्या कार्यालयात समक्ष आणून द्यावेत, असे आवाहन केले आहे.


















