न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १५ मे २०१९) :- छावा युवा संघटना व पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीतर्फे भोसरी एमआयडीसी येथे छत्रपती संभाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून, जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी छावा युवा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष अभय भोर यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या प्रसंगी छावा युवा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष अभय भोर, सुनील घोडेकर, माधुरी गुरव, सुनिता भोर, गणेश विपट, फोरमचे उपाध्यक्ष कार्तिक गोवर्धन, सूरज साळवे बाळकृष्ण थोरात, मुकुंद गुरव, किरण इंगोले, श्रीकृष्ण नरहरी, दुर्गा भोर, इर्शाद शेख व पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडी तसेच छावा युवा संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरात छत्रपती संभाजी महाराजांचे विचार जनतेपर्यंत पोहोचावेत यासाठी संभाजी महाराज यांच्या पुस्तकांचे दालन लवकरात लवकर चालू करण्यात येणार आहे, असे भोर यांनी यावेळी सांगितले.















