- भोसरीतील गुळवे वस्तीमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जानेवारी २०२५) :- दारू पिण्यासाठी नकार दिल्याने तरुणावर तलवारीने वार केले. ही घटना बुधवारी (दि. १) पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुळवे वस्ती भोसरी येथे घडली.
अनुज फेबियन केओ (वय २८, रा. दापोडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नवप्रीत अजित सिंग (२९, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी नवप्रीत याचे गुळवे वस्ती भोसरी येथे वर्कशॉप आहे. वर्कशॉपमध्ये नवप्रीत हा दारू पीत असताना त्याने अनुज यांना दारू पिण्याचा आग्रह केला. त्यासाठी अनुज यांनी नकार दिला असता नवप्रीत याने अनुज यांच्यावर तलवारीने वार केले. यामध्ये अनुज गंभीर जखमी झाले आहेत.













