न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२५) :- स्वयंघोषित दोन भाईंनी नागरिकांना शिवीगाळ करत एकाला मारहाण केली. त्यानंतर एका महिलेला मारहाण केली. कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. ही घटना ३१ डिसेंबर २०२४ रोजी रात्री नाणेकर चाळ पिंपरी येथे घडली.
रवी धारासिंग राजपूत (वय ३५, रा. नाणेकर चाळ, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्धार्थ राजू वाघमारे (वय २१, रा. नाणेकर चाळ, पिंपरी), अमन शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजपूत, त्यांचा भाऊ आणि मित्र नाणेकर चाळ येथील एका गोडावूनमध्ये बसले होते. त्यावेळी संशयित आरोपी तिथे आले. त्यांनी गोडावूनच्या दरवाजावर लाथा मारून शिवीगाळ केली. राजपूत यांनी दरवाजा उघडला असता संशयितांनी त्यांना मारहाण केली. आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणत कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. राजपूत यांच्या आईला देखील मारहाण केली. पोलिसांनी सिद्धार्थ वाघमारे याला अटक केली आहे.












