- हभप दोंडाईचेकर यांच रविवारी वाल्हेकरवाडीत कीर्तन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२५) :- वाल्हेकरवाडी चिंतामणी चौक, पीएमआरडीए ग्राऊंड येथे उद्या रविवार दिनांक ०५/०१/२०२५ रोजी संध्याकाळी ६ ते ९ वाजता खान्देशचे सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप रविकिरण दोंडाईचेकर महाराज कीर्तन सादर करणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते खान्देश युवा महासंघ पुणे संस्थापक अध्यक्ष माऊली जगताप मित्र परिवाराच्या पुढाकाराने सदरचा कार्यक्रम सादर होत आहे.
याच पार्श्वभूमीवर शहरात कार्यरत असणारे खान्देशातील सामाजिक कार्यकर्ते व अधिकारी दीपक भदान,रविंद्र चौधरी, धीरज नारखेडे, दादाजी डी पगार, नरेंद्र चऱ्हाटे, ज्योती किणगे, गौरी सरोदे यांना “खान्देश रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण अभ्यासक व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे राज्य अध्यक्ष डॉ.विजयकुमार पाटील व खान्देश युवा महासंघाचे अध्यक्ष माऊली जगताप हे उपस्थित होते.
या प्रसंगी राज्य महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माऊली जगताप म्हणाले,” आपल्या पिं चिं शहरामध्ये खान्देशच्या नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यातून अनेक कष्टकरी रोजगारानिमित्त स्थलांतरित झाले आहेत.शहराच्या उपनगरात खान्देशी संस्कृतीही ह्या ३५ वर्षात त्यांनी रुजवली आहे.त्यातील युवा पिढीने ५ वर्षांपूर्वी खान्देश युवा महासंघ – पुणे – महाराष्ट्र ची स्थापना केली. याच ५ व्या वर्धापनदिना निमित्त महाआरोग्य शिबीर व विविध कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक ०५ जानेवारी २०२५ रोजी केलेले आहे.शहरातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा”
“खान्देशरत्न” पुरस्कार निमित्त प्रमुख उपस्थित प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष डॉ.विजयकुमार पाटील म्हणाले,” वाल्हेकरवाडी ,आकुर्डी, प्राधिकरण, रावेत ,बिजलीनगर या उपनगरांच्या परिसरात खान्देशी समाज त्यांची संस्कृती जपत अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात अनेक उद्योग उभे राहिले तसेच अनेक व्यवसायांना पूरक मनुष्यबळ ही उभे राहिले. त्यातील युवा पिढीने विविध उपक्रम राबवून समाजाचे एकत्रीकरण केले. ह्या सर्व कार्यकर्त्यांचा “खान्देश रत्न” पुरस्काराने सन्मान होणे उल्लेखनीय आहे.महासंघाचे कार्य असेच संपूर्ण महाराष्ट्रात पसरणे आवश्यक वाटते.”













