न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२५) :- पिझ्झा मध्ये चाकूचा तुकडा आढळल्याची घटना घडली आहे. या घटने प्रकरणी तक्रारदार कापसे यांनी शहरातील एका पिझा हटमधून पिझ्झा खरेदी करू नये, अस आवाहन नागरिकांना केल आहे. अरुण कापसे यांना पिझ्झा खात असताना किरकोळ जखम झाली आहे.
कापसे यांनी शुक्रवारी स्पाईन रोड येथून डॉमिनोज पिझ्झामधून पिझ्झा ऑर्डर केला होता. यासाठी त्यांनी ५९६ रुपये देखील त्यांना ऑनलाईन दिले. परंतु, जेव्हा हा पिझ्झा आला आणि ते खात होते. त्यावेळी त्यामध्ये चक्क चाकूचा तुकडा आढळला. पिझ्झा खात असताना तो चाकूचा तुकडा त्यांना टोचल्याने ही बाब समोर आली, अशी माहिती अरुण कापसे यांनी दिली आहे.
याबाबत डोमिनोज पिझ्झाच्या मॅनेजरला माहिती दिली. आधी टाळाटाळ करणाऱ्या मॅनेजरने फोटो पाठवल्यानंतर अरुण कापसे यांच्या घरी धाव घेऊन सोशल मीडियात फोटो व्हायरल न करण्यासाठी विनंती केली. डॉमिनोज पिझ्झा मध्ये पिझ्झा न खाण्याचं आवाहन कापसे यांनी ग्राहकांना केल आहे. तुम्हीही बाहेर कुठे पिझ्झा खात असाल तर त्या पिझ्झा मध्ये आपल्याला इजा होईल अशी वस्तू तर नाही ना? याची खात्री नक्कीच करा.













