न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जानेवारी २०२५) :- आकुर्डीतील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) येथे सुसज्ज इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. दरम्यान येथील तळमजल्यावरील इमारतीच्या एका छताला असणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईनला किरकोळ स्वरूपात गळती लागली आहे.
‘टॉयलेट बाथरूमकडे’ जाणारा हा भाग असल्यामुळे येथे नागरिकांची वर्दळ असते. थेंबथेंब साचलेल्या पाण्यामुळे त्यावर पाय पडून घसरून पडण्याची शक्यता अधिक आहे. सतत साचणाऱ्या पाण्यामुळे फरशीला देखील डाग पडलेले आहेत.
स्वच्छता कर्मचारी साचलेले पाणी काढतात. स्वच्छताही करतात परंतु, पीएमआरडीए प्रशासनाने वेळेत पाईपलाईनची डागडुजी करून गळती थांबवावी, अशी मागणी नागरीकांमधून होत आहे.












