न्यूज पीसीएमसी नेटवर्क
महाळुंगे (दि. १० जानेवारी २०२४) :- रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नऊ वर्षीय मुलाला भरधाव वाहनाने धडक दिली. यात मुलाचा मृत्यू झाला. ही घटना कुरुळी येथे बांदल वस्तीमध्ये मोई-कुरुळी रस्त्यावर मंगळवारी (दि. ७) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात चालकाचा पोलिस शोध घेत आहेत.
देवाशीश अशोक चावरे (९, रा. मोई, ता. खेड, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील अशोक एकनाथ चवरे (४७) यांनी बुधवारी (दि. ८) याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी वाहनावरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक हे मोई कुरुळी रस्त्यावरील किराणा मालाच्या दुकानात किराणा भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा देवाशीश हा रस्त्याच्या कडेला उभा होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या गाडीने देवाशीश याला धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला मार लागला. त्यास रुग्णालयात दाखल केले.












