पाच जणांच्या टोळीपैकी दोघे गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 10 जानेवारी 2025) :- ‘तू काय भाई झालास काय? मी भाई आहे, माझी दहशत तुला माहीत नाही का? याला सोडायचे नाही, याला आज खपवून टाकू. याला आज तोडा, असे म्हणत पाच जणांच्या टोळक्याने रहाटणीतील कोकणे चौक परिसरात 24 वर्षीय डिलिव्हरी बॉयसह त्याच्या मित्रावर चाकू आणि तलवार अशा धारदार शस्रांनी वार केल्याचा प्रकार बुधवार (दि. 8) रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला आहे.
याप्रकरणी मन्सूर शेख (वय 24 वर्षे) या तरुणाने बप्पा सातपुते रा. थेरगाव, दीपक सातपुते रा. थेरगाव, सुरज पिंगळे रा. रहाटणी, वैभव पहाडे, शुभम जाधव यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. भांडणाच्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
काळेवाडी पोलिसांनी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील घटनेचा तपास पोनि गुन्हेचे बनसोडे हे करीत आहेत.












