न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 10 जानेवारी 2025) :- थेरगावात ‘रम्मी’ नावाचा जुगार सुरू होता. याची कुणकुण पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारला लागली. त्यांनी घटनास्थळी छापा मारला.
त्यावेळी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जुगार सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी जुगार खेळण्याचे साहित्य आणि रोख रक्कम १९४५० असा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई गुरुवार (दि. ९) रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास थेरगाव येथे केली. याप्रकरणी पोलीस शिपाई अमर राणे यांनी फिर्याद नोंदवली आहे.
अतुल घोगरे, ज्ञानेश्वर ठाकूर, विनायक एरंडे, राजेंद्र थोरात, साधू गुजर, मच्छिंद्र बारणे (सर्व राहणार थेरगाव) यांच्या विरोधात जुगार कलमाखाली काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटनेचा तपास मसपोनी कोरडे हे करीत आहेत.












