न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१२ जानेवारी २०२५) :-राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा जन्म दिनांक 12 जानेवारी 1598 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळ देऊळगाव या ठिकाणी झाला. तसेच स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिनांक 12 जानेवारी 1863 साली कोलकाता येथे झाला.
दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनचे वतीने त्रिवार अभिवादन करून संपन्न झाला असुन याप्रसंगी ॲड. अरुण खरात (मामा), माजी अध्यक्ष ॲड. सुनील कडूसकर सर, माजी अध्यक्ष ॲड. प्रमिला गाडे मॅडम, ॲड. नारायण थोरात सर, ॲड. विशाल पौळ, ॲड. मुस्तफा शेख, ॲड. क्षीरसागर, ॲड. जितिन ठाणांबिर आदी उपस्थित होते. तसेच 2024-2025 कार्यकारणी अध्यक्ष ॲड. पांडुरंग विठ्ठल शिंगारे, उपाध्यक्ष ॲड. यादव सचिव, ॲड. संदीप तापकीर, महिला सचिव ॲड. संगिता रमेश कुशलकर सहसचिव ॲड.पद्मावती पाटील खजिनदार ॲड.विशाल पोळ हिशोब तपासणीस ॲड. प्रेरणा चंदानी सदस्य ॲड. अक्षय चौधरी, ॲड. पोर्णिमा मोहिते ॲड. सुषमा पाटील ॲड. रुपाली पवार ॲड. विजय भोंडे हजर होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. तेजस चवरे व आभार महिला सचिव ॲड. संगिता रमेश कुशलकर यांनी केले आहे.












