न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१२ जानेवारी २०२५) :- ईसीआरस, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि शिवराज मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांच्या वतीने ३६ व्या राष्ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत सुरक्षेचे धडे व नियम याबाबत शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
मोटार वाहन निरीक्षक प्रदीप शिंगारे, ईसीआरएसचे संताजी मुळीक, शिवराज मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे चेअरमन रोशन मिस्त्री आणि ड्रायव्हर बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.












