न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२५) :- बीआरटीत घुसखोरी करणाऱ्या वाहन चालकांवर सोमवारी (दि. १३) रोजी दुपारी साडेचारच्या दरम्यान वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.
चिंचवड स्टेशन येथील बीआरटीमधून पिंपरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी वाहन चालकांनी वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रकार देखील निदर्शनास आला.
बेजबाबदार पद्धतीने वाहन चालवून अपघाताचे प्रमाण शहरात सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे अशी कारवाई होणे गरजेचे आहे. सध्या मार्च महिना जवळ आला आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी ही कारवाई केली जात आहे का? असा सवाल यावेळी वाहन चालकांनी उपस्थित केला.
















