न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२५) :- प्रभाग क्र 26 पिंपळे निलख येथील नवीन सार्वजनिक उद्यानाचे काम पुर्णत्वास आले आहे. भुमी आणि जिंदगी विभागाचा आदेश क्र.भुजी/09/कावि/407/2021.दि 21/12/2021 या आदेशानुसार महापुरुषांची नावे उद्यानास, सार्वजनिक इमारतीस देण्यास कार्यपद्धती ठरवून घेतली आहे. त्यामुळे थोर समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य येणाऱ्या पिढीला प्रेरणा देत ऊर्जा अवस्थेत ठेवणारे आहे.
पिंपरी चिंचवड जागतिक दर्जाचे शहर बनत असताना शहरामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या नावे असणारे उद्यान येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरेल, असे मत रविराज काळे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना भेटून निवेदनाद्वारे केले.
लवकरात लवकरात अण्णाभाऊ साठे यांचे नाव देऊन सार्वजनिक उद्यान नागरिकांसाठी खुले करावे, अशी विनंती युवक शहराध्यक्ष आम आदमी पार्टीचे रविराज काळे यांनी केली.