- पालिकेचा भूसंपादन परतावा अमान्य झाल्यास प्रकल्प खोळंबणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 17 जानेवारी 2025) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणी शहरात आणले जाणार आहे. त्यासाठी भामा आसखेड धरण ते नवलाख उंबरे व तेथून चिखली येथील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत ३१ किलोमीटरची भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यासाठी खासगी भूधारकांची जमीन ताब्यात येणे बाकी आहे.
मावळ तालुक्यातील इंदुरी, जाधववाडी, नवलाख उंबरे, खेड तालुक्यातील करंजविडे, वाकीतर्फे वाडा येथील महत्वाचे भूसंपादन खोळंबले आहे.
पालिकेने मावळ तालुक्यातील भूधारकांचा मोबदला महसूल खात्याकडे जमा केला आहे. तर, खेड तालुक्यातील जागा मालकांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरु आहे. हा मोबदला देऊन लवकरात लवकर पाईपलाईनसाठी अपेक्षित जमिनीचा ताबा घेतला जाणार आहे. पण, हा मोबदला शेतकऱ्यांना मान्य नसल्यास हे काम खोळंबण्याची शक्यता आहे.
भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्पासाठी अपेक्षित भूसंपादन करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. लवकरच भूसंपादन करुन पाइपलाइनचे काम मार्गी लावले जाईल. खासगी जमीन ताब्यात आल्यानंतर पाइपलाइनच्या कामातील अडथळे दूर होऊन प्रकल्पाचे काम वेळेत मार्गी लावता येईल.
– मा. प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता (१)…












