- पोलीस आयुक्तालयाकडून स्वतंत्र ‘औद्योगिक तक्रार निवारण पथका’ची स्थापना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 17 जानेवारी 2025) :- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे उद्योगधंदे जोमात सुरू आहेत. तसेच विविध स्वरूपाच्या गुन्ह्यात देखील वाढ होत आहे. अलीकडच्या काळात उद्योजकांना खंडणीसाठी दमदाटी करण्याचे प्रकारचे सर्रास वाढलेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
याला आळा घालण्यासाठी चार वर्षांपूर्वी खंडणी विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली होती. त्या अंतर्गत औद्योगिक तक्रार निवारण पथकाची स्थापना करण्यात आली होती.
दरम्यान आता पुन्हा नव्याने स्वतंत्र औद्योगिक तक्रार निवारण पथकाची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने स्थापना करण्यात आलेली आहे. औद्योगिक क्षेत्रात खंडणी मागणे, अशांतता पसरविणे यासारखे गुन्हे होऊ नयेत, यासाठी हे पथक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार आहे.
या पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक हे असून पोलीस उपायुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्यामार्फत कार्यवाहीचा अहवाल पोलीस आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे.












