न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२५) :- दापोडीतील येथील सामाजिक कार्यकर्ते कै. मुरलीधर बबन फुगे (वय- ७२ वर्षे) यांचे शुक्रवारी (दि. १७) रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी शुक्रवार (दि. १७) रोजी फुगेवाडी येथे संपन्न झाला आहे.
चिखलीतील भाजपचे युवा नेते पांडाभाऊ साने यांचे ते सासरे तर, नवदुर्गा सखी मंचच्या अध्यक्षा रुपालीताई पांडाभाऊ साने यांचे ते वडील होत. त्यांच्या जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.












