न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२५) :- गॅस सिलेंडरचा काळाबाजार केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई भोसरी येथील आळंदी रस्त्यावरील महाराष्ट्र चौकाजवळ करण्यात आली.
अजय धर्मराज सकुंडे (वय २७) व अमोल हनुमंत जाधव (वय २८ रा. संकल्प वस्तू इमारत, च-होली फाटा, मूळ- बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आरोपींकडे कसलाही परवाना नसताना घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून रिफीलच्या साहाय्याने गॅस धोकादायकरीत्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये काढून घेत होते.
पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करून ३५ घरगुती वापराचे, ३३ व्यावसायिक गॅस सिलिंडर, वजन काटा, गॅस रिफील करण्याचे साहित्य असा एकूण दोन लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.












