न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२५) :- महापालिकेच्या पिंपळे निलख प्राथमिक शाळेला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी सकाळी अचानक भेट दिली. त्यामुळे शिक्षकांची ऐनवेळी फजिती उडाली.
भुसे यांनी २० मिनिटे शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांचे वाचन आणि लेखन कौशल्य तपासले. विद्यार्थ्यांची बौद्धिक तपासणी करत काही प्रश्नही विचारले. यावेळी त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील विविध प्रश्न विचारले.
तसेच विद्यार्थिनींना पाढे म्हणण्यास सांगितले. विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेतले. कविता म्हणून घेतल्या. तसेच त्यांनी स्मार्ट टीव्हीवर शिकविण्यात येणारा ई क्लासही पाहिला.












