न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 25 जानेवारी 2025) :- ऑल इंडिया केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीने माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त चिंचवड स्टेशन येथील दवा बाजार परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गिरीधरलाल एजन्सीचे पियुष लोढा, लाइफ केअर एजन्सीचे कमलेश, झायडस हेल्थ केअरचे वैद्यकीय प्रतिनिधी नरहरी कुलकर्णी आदी उपस्थित होते.
या शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करण्यात आले. केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट आणि पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशन यांच्या पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले.















