न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २५ जानेवारी २०२५) :- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. यामुळे पुढील चार दिवसांचे त्यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार,शरद पवारांना खोकला झाल्याने बोलण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे कार्यक्रमांत त्यांना भाषण देता येत नाही. परिणामी पुढील चार दिवसांचे त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून देण्यात आली आहे.










