न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 28 जानेवारी 2025) :- आठ जणांनी शंभर कोटींचं कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवले. कर्ज मंजूर झाल्याबाबत खोटे बाॅड सर्टिफिकेट देत लोन मंजुरीसाठी प्रोसेसिंग फी म्हणून एक कोटी वीस लाख रुपये दोघांच्या खात्यावर पाठवण्यास सांगून जागा खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला आर्थिक गंडा घातलेला आहे.
हा प्रकार जुलै 2023 मध्ये मोशी येथे घडलेला आहे. याप्रकरणी 57 वर्षे फिर्यादीने आरोपी संतोष कमलकर, किरणा जगताप, महेश शेलार, विकास सोनवणे, अमर झिंगाडे पाटील, पटेल, स्वामी, स्वामी महाराज, हसमुखभाई कावड, महाकाली यांच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यास तक्रार दिली आहे.
या सर्वांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे हे करीत आहेत.











