न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२५) :- निगडी प्राधिकरण येथील सेक्टर २५ ज्ञानप्रबोधिनी शाळेजवळील एकेरी वाहतुकीचा विषय नागरिकांच्या विरोधामुळे महापालिकेने गुंडाळला आहे. याबाबत लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांची बैठक झाली.
या बैठकीस आ. उमा खापरे, माजी नगरसेविका शैलजाताई मोरे, मा. नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, मनसे उपाध्यक्ष बाळा दानवले, बीआरटी विभागाचे बापूसाहेब गायकवाड, उपअभियंता संजय पवार, गिरीश गुठे, वाहतूक पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे, निलेश शिंदे, बाळा शिंदे, राजू बाबर तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
नागरिकांना विश्वासात न घेता हा प्रकल्प राबविल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांनी एकमुखाने महापालिका अधिकाऱ्यांना एकेरी वाहतुकीचा निर्णय माघारी घेण्यास भाग पाडले आहे.
एकेरी वाहतूकीचा निर्णय जाहीर झाल्यापासून ते आजपर्यंत मी प्रयत्न केले. नागरिकांची मागणी लावून धरली. परिसरातील अडीचशे नागरिकांच्या सह्यांचे पत्र महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग बापू बांगर यांना दिले. आंदोलनाचा इशाराही दिला होता. या निर्णयामुळे सर्व परिसरातील नागरिक व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. एकेरी वाहतूकीसाठी लावण्यात आलेले बेरीकेट्स, पोस्टर्स व डिव्हायडर काढून टाकण्यात आले आहेत.
– बाळा दानवले, उपाध्यक्ष – मनसे पिंपरी चिंचवड शहर…











