न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२५) :- निगडी प्राधिकरण परिसरात रविवारी चार वर्षाच्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले. या बिबट्याची प्रकृती ठणठणीत असून त्याला वनविभागाच्या वतीने सोमवारी रात्री नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती पुणे विभागाने दिली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील प्राधिकरण परिसरामध्ये रविवारी सकाळी बिबट्या दिसून आला होता. त्यामुळे प्रचंड भीतीचे वातावरण होते. मात्र, अग्निशामक दल, वनविभाग रेस्क्यू टीमच्या दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात यश आले. त्यानंतर बिबट्याला बावधन येथील उपचार केंद्रात नेले. वन्यजीव चिकित्सकाने आरोग्याची तपासणी केली आहे. त्याला कोणतीही जखम झालेली बिबट्या कोठून आला, याचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे.
दुर्गादेवी टेकडीची पाहणी करणार आहे. रविवारी बिबट्या जेथे आढळला, तेथील आजूबाजूच्या परिसराची पाहणी वनविभागाच्या वतीने सुरू केली आहे. बिबट्या कोठून आला, याचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे. त्याचबरोबर जवळच असणाऱ्या दुर्गादेवी टेकडी या परिसराचीही पाहणी करण्यात येणार आहे, असे वन विभागाचे अधिकारी दीपक पवार यांनी सांगितले.












