न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली / तळेगाव प्रतिनिधी (दि. ०७ फेब्रुवारी २०२५) :- चिखली कुदळवाडीतील मोरे पाटील चौकात गुरुवारी रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. येथील कपड्याच्या दुकानाला आग लागल्याचे वृत्त हाती आले आहे. आगीत जीवित अथवा मालमत्तेचे किती नुकसान झाले याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही.
दरम्यान मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या नवीन इमारतीला देखील गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागली. आगीमुळे तळेगावात धुराचे लोट उठले होते. सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा अग्निशमन विभाग, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आपत्ती व्यवस्थापन टीम आणि तळेगाव एमआयडीसी अग्निशमन दलाला ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे नवीन बांधकाम आणि सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. वेल्डिंगचे काम चालू असताना ठिणगी उडून ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.















