न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. ०७ फेब्रुवारी २०२५) :- चाकण येथील खराबवाडीमध्ये एका हॉटेलमध्ये कामगारांच्या खोलीत खुनाचा प्रकार घडलेला आहे. यातील मयत इसम विजय विनायक पांचाळे (वय ३५ वर्ष, मूळ राहणार अमरावती) हा स्वयंपाकीचे काम करत होता. त्यास आरोपी उदय प्रकाश गिरी (वय ३५ वर्ष) याने कामाच्या वादातून भाजी कापायचा सुरा गळ्यावर भोसकून गंभीर जखमी करीत त्याचा खून केलेला आहे.
हा प्रकार (दि. ७) रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास घडला. आरोपी हा देखील तेथे स्वयंपाकीचे काम करतो. हॉटेलमध्ये स्वयंपाकीचे काम करण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता.
घटना घडल्यानंतर आरोपीला लागलीस ताब्यात घेतलेले असून गुन्हा नोंदवण्याची व तपासाची कार्यवाही चालू आहे, अशी माहिती महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी दिली.