न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२५) :- दुचाकीवरून कासारवाडी दिशेकडून पिंपळे सौदागरकडे येत असताना समोरून आलेल्या वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर बसलेले दोघेजण खाली पडले.
दरम्यान त्यातील एकाला किरकोळ दुखापत झाली तर, दुसऱ्याच्या डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार सुदर्शन चौक येथील अंडरपास जवळील पिंपळे सौदागर परिसरात घडलेला आहे.
गुड्डू यादव (वय ३५ वर्ष) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अनिल धनवे यांनी आरोपी वाहनचालक निखिल चव्हाण याच्या विरोधात फिर्याद नोंदवलेली आहे.
सांगवी पोलिसांनी याप्रकरणी वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भालेराव हे करीत आहेत.
















