न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२५) :- गिलियन बेरे सिंड्रोमचा (GBS) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.
दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करणाऱ्या अनधिकृत खाजगी आरओ तसेच एटीएम वॉटर प्लांट्सची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेत आढळून आलेल्या सात आरओ आणि वीस एटीएम वॉटर प्लांटसवर महापालिकेने कारवाई केली असून संबंधित चालकांना प्लांट तात्काळ बंद करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती माहिती पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी दिली.


















