न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२५) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमांतून राज्यभरात उद्या ११ फेब्रुवारी २०२५ पासून बारावीची सुरू होत आहे. या परीक्षेला १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी बसले आहेत. तर यामध्ये ८ लाख १० हजार ३४८ मुले, ६ लाख ९४ हजार ६५२ मुली, तर ३७ ट्रान्सजेंडर परीक्षा देणार आहेत. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शरद गोसावी म्हणाले, पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळाअंतर्गत १२ वीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. यंदाच्या वर्षी बारावीची परीक्षा १० दिवस अगोदर होत आहे. ही परीक्षा लवकर घेतल्याने निकाल लवकर लागेल. १५ मे पर्यंत बारावी आणि दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. १० हजार ५५० कनिष्ट महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून ३ हजार ३७३ मुख्य केंद्रावर परीक्षा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली. तर मागील पाच वर्षाच्या काळात ८१८ केंद्रावर सातत्याने गैरप्रकार आढळून आले आहेत. त्यामुळे ती सर्व केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहे. या सर्वांवर विशेष लक्ष मंडळाचे असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

















3 Comments
📲 + 0.75361406 BTC.NEXT - https://telegra.ph/Binance-Support-02-18?hs=c247fd6073d3043b3fa5b5dfdf1b24e3& 📲
3bsw34
Roger Wittenberg
What i don’t realize is actually how you’re not really much more smartly-favored than you might be right now. You are very intelligent. You understand thus significantly on the subject of this subject, produced me individually consider it from a lot of varied angles. Its like men and women are not involved until it is one thing to accomplish with Girl gaga! Your personal stuffs excellent. Always take care of it up!
Hockey Matches Online
Normally I don’t read post on blogs, but I wish to say that this write-up very forced me to check out and do it! Your writing taste has been surprised me. Thank you, quite nice article.