- दुसऱ्याला थेट ‘युपी’तून उचललं; पोलीस आयुक्तांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२५) :- चाकण एमआयडीसीतील कैलाश स्टीलच्या मॅनेंजरवर गोळीबार करुन हत्येची सुपारी देण्याऱ्या चुलत भावासह एका आरोपीला उत्तर प्रदेश येथुन गुंडाविरोधी पथकाने घेतले ताब्यात आहे. संग्राम उर्फचंदन आनंत सिंग (वय ४२ वर्षे रा. मारुंजी, रोहीत सुधन पांडे (वय २३ वर्षे, रा. उत्तर प्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
जानेवारी महिन्यात ही घटना घडली होती. यात कैलास कंपनीचे मॅनेजर अजय विक्रम सिंग (वय ३५ वर्षे रा. हिंजवडी) हे गंभीर जखमी झाले होते. कंपनीच्या कॅबीनकडे जात असताना काळ्या शाईन मोटार सायकलवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी पिस्तुलातून दोन गोळ्या मारुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
पोलिसांनी देताना सांगितले की, या घटनेच्या तपासासाठी वेगवेगळ्या टिम बनवुन तपास सुरु होता. घटनास्थळावरील वेगवेगळ्या ठिकाणचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले. दरम्यान फिर्यादीचा चुलतभाऊ संग्राम याच्याकडे तपास करता त्याने गुन्हा केल्याचे कबुल करीत ओळखीच्या चार कामगारांना १२ लाख रुपये देण्याचे कबुल केले. ठरल्याप्रमाणे संग्रामने चार कामगार यांना अजय सिंग यांचा फोटो, कैलाश स्टील कंपनीचा पत्ता, गुगल लोकेशन व अजय सिंग याचा येण्या जाण्याचे टायमिंग दिले होते. वरील आरोपी यांनी घटनेच्या पाच ते सहा दिवस अगोदर वेगवेगळ्या गाड्या मधुन येवुन रेकी केली व अजय सिंगला मारण्याचा प्लॅन केला.
सदर तपासामध्ये आरोपी संग्राम यास (दि. ११) रोजी अटक करण्यात आली असुन कोर्टाने त्यास (दि. १६) पर्यंत पोलीस कस्टडी मंजुर केली आहे. आरोपी रोहीत याला उत्तर प्रदेश येथुन ताब्यात घेवुन पुढील तपासकामी गुन्हयाचे तपास अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ते पुढील तपास करीत आहेत. अटक आरोपी संग्रामवर यापुर्वी फसवणुकीचे १) हाजीरा पो. ठाणे (गुजरात) व २) कळंबोली पो. ठाणे (महाराष्ट्र) येथे गुन्हे दाखल आहेत. उर्वरीत आरोपी अटक करणेसाठी गन्हे शाखा व स्थानिक पोलीस स्टेशनचे पथके प्रयत्न करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे-१ विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एच.व्ही. माने, पोउपनि, अशोक जगताप, स.पो. फौ पी.पी. तापकीर, स.पो.फौ. एस.एन. ठोकळ, स.पो.फौ. व्ही.एच. जगदाळे, स.पो.फौ. ए. पी. गायकवाड, पो. हवा ४८० जी.डी. चव्हाण, पो.हवा १६०४ एस. डी. चौधरी, पो. हवा ९५६ व्ही.टी. गंभीरे, पो.हवा २९२० जी.एस. मेदगे, पो.हवा. १७२९ एस.पी. बाबा, पो.हवा. १७२८ एन.बी. गेंगजे, पो.हवा. १७८८ व्ही.डी. तेलेवार, पो.शि. २०८४ व्ही. एन. वेळापुरे, पो.शि २८१२ आर. के. मोहीते, पो. शि २८४९ एस.टी. कदम, पो. शि२३८४ टी.ई. शेख यांनी केली आहे.


















