- ई-हक्कच्या अंमलबजावणीसाठी सक्ती; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १३ फेब्रुवारी २०२५) :- ‘ई-हक्क’ प्रणालीवरील वारस नोंद, मृताचे नाव कमी करणे, बोजा चढविणे अथवा गहाणखत करण्यासारख्या ११ प्रकारच्या सुविधांसाठी आता केवळ ऑनलाइनच कार्यवाही होणार आहे. त्यामुळे अर्ज कोणत्या टेबलवर प्रलंबित आहे, याची माहिती सहज कळणे शक्य होणार असून, ई-हक्कची १०० टक्के अंमलबजावणी होण्यासाठी ऑनलाइनद्वारे अर्ज घेण्याचे सक्तीचे करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
अनेकदा नागरिकांकडून ‘ऑफलाइन’ अर्ज दाखल केले जातात. ते ‘ऑफलाइन’ आलेले अर्ज ‘ऑनलाइन’ स्वरूपात दाखल करून घ्या आणि पुढील कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. नागरिकांना ई-हक्क प्रणालीद्वारे ११ प्रकारच्या फेरफार नोंदीचे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, ग्रामीण भागात अनेकांना ऑनलाइनद्वारे अर्ज करणे शक्य होत नाही किंवा त्याबाबत फारशी माहिती नसते. त्यामुळे ते लिखित स्वरूपात अर्ज तलाठ्यांकडे देतात. मात्र, अनेक दिवस त्यावर कार्यवाही न झाल्याने नागरिकाला ती सुविधा उपलब्ध होत नाही. तसेच त्या अर्जाबाबत ऑनलाइन नोंद नसल्याने वरिष्ठांना संबंधितांवर कारवाई करता येत नाही.
ई-हक्क प्रणालीद्वारे फेरफार उपलब्ध करण्याच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. मात्र, त्याची जिल्ह्यात १०० टक्के अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे नागरिकांकडून ई-हक्क प्रणालीद्वारे अर्ज दाखल करण्याचे प्रमाण कमी झाले. दुसरीकडे, महसूल विभागाच्या वतीने ई-हक्क माध्यमातून केलेले अर्ज मंजूर करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.













1 Comments
✂ Sending a transfer from us. Receive > https://telegra.ph/Binance-Support-02-18?hs=acc6570d9fea697adcc87db1434561e9& ✂
kb23jy