न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १७ मे २०१९) :- पीडित महिलेशी हुज्जत घालत शरीरसुखाची मागणी केली. यासाठी महिलेने नकार दिला असता तरुणाने महिलेच्या घराच्या काचा फोडून महिलेला शिवीगाळ केली. तसेच तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला.
या प्रकरणी तीस वर्षीय महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, लक्ष्मण नागेश धोत्रे (वय २०, रा. अजंठानगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार मागील सहा महिन्यांपासून सुरू होता. हा प्रकार चिंचवडमधील अजंठानगर परिसरात बुधवार (दि. १५) रोजी घडला आहे. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.











