न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०१९) :- शहरात उन्हाचा तडाखा वाढल्याने आणि पावसाला अजून बराच अवकाश असल्याने भर दुपारी बाहेर पडण्यास अनेकजण टाळतात. मात्र, पक्षांचे काय? त्यांना उन असो की पाऊस पाणी व दाण्यासाठी भर उन्हातही त्याच्या शोधार्थ भटकावे लागते. त्यातच यंदाचा उन्हाळा फारच कडक आहे. पक्षांना पाणी व दाण्यासाठी फार वणवण करावी लागते.
परंतू, निसर्गप्रेमी मात्र अशा कडक उन्हातही पशु-पक्षांच्या हितासाठी झटत असतो. असेच एक निसर्गप्रेमी दिनेश यादव यांनी सांगितले की, पक्षांसाठी दाणा पाणी देण्याचा प्रयत्न चालवला आहे. पाण्याच्या वाट्या आणि पक्षांचे अन्न उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून कडक उन्हात पक्षांना त्याचा उपयोग होईल.
आमच्या गोठ्यावर एक टेबल आहे. त्यावर एक पातीले भरुन पक्षांसाठी पाणी ठेवलेले आहे. पक्षी जेव्हा ताण लागेल तेव्हा तेथे येऊन पाणी पितात. त्यांना पाणी पिताना पाहुन मन प्रसन्न होते. कारण त्यांनाही जगण्यासाठी पाणी हवच ना.. तुम्हीही नक्की हे करा.. आपल्या घरावर किंवा टेरेसवर, जमेल तेथे पक्षासाठी पाण्याची सोय करा. हे करण्यासाठी आपला थोडा वेळ जाईल. पण त्यामुळे एखाद्या पक्षाचे प्राण वाचतील.











