- पालक आणि शाळांनी सहकार्य करावं; पालिकेच्या वैद्यकीय विभागाच आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे १ मार्च २०२५ पासून जापनीज एन्सेफलायटीस अर्थात जेई प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
जेई हा विषाणूजन्य आजार असून, तो प्रामुख्याने १५ वर्षांखालील मुलांना होतो. या आजारामुळे गंभीर मज्जातंतू विकार होण्याची शक्यता असते, तसेच याचा मृत्यूदरही अधिक आहे. यामुळे मृत्यूचे प्रमाण सुमारे ३० टक्के आहे, आणि ३०-४० टक्के बरे झालेल्या मुलांमध्ये विशिष्ट परंतु मज्जातंतूशी संबंधित अपंगत्व आयुष्यभर राहते. त्यामुळे या आजारापासून बचावासाठी लसीकरण करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आले आहे.
जेई प्रतिबंधक लसीकरण ही सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वाची मोहीम आहे. पालकांनी व शिक्षकांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा आणि प्रत्येक बालकाला लसीकरण मिळावे, यासाठी प्रयत्न करावेत. संपूर्ण समाजाने या मोहिमेस सहकार्य करून आपल्या पुढील पिढीचे आरोग्य सुरक्षित करणे आवश्यक आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका












