न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२५) :- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने मराठी राजभाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी धुरपत साखरे, यांच्या हस्ते कविवर्य. वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे व सरस्वतीचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, शाळेचे सामाजिक कार्यकर्ते जितेश जगताप, बाळासाहेब शेंडगे,हर्षवर्धन कांबळे, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत उपस्थित होते.
“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी…” मराठी भाषा आमुची मायबोली -म्हणजे मातृभाषा. मराठी भाषेचा हाच गोडवा कित्येक साहित्यिक, गीतकार व गायकांनी आपल्यापरिने समृद्ध करण्यास अनमोल योगदान दिलेले आहे, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी केले.
यावेळी शिक्षकांनी निशा पवार ,सचिन कळसाईत, मंथन जाधव यांनी मराठी भाषेविषयी माहिती सांगितली तसेच भक्ती गीत ज्ञानेश्वरी काटे आणि मराठी ओवी सृष्टी साबळे यांनी गायले सातवीच्या विद्यार्थ्यांनी माय मराठी, इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना मायभूमी ,कर्मभूमी पाचवीच्या विद्यार्थ्यांनी जय जय महाराष्ट्र माझा व गौरव महाराष्ट्राचा मराठी कविता, मराठी गीत व नृत्य सादर केले. मराठी गौरवानिमित्ताने काव्य वाचन, भित्ती चित्र स्पर्धा घेण्यात आली. अनिता रोडे यांनी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. भावना देवरे ह्यांनी सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन दिव्या सराफ यांनी केल.