न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०१९) :- काळेवाडी येथील भारत गॅस एजन्सीतील कॅशियर सुहास यांनी गुरुवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास गॅस एजन्सीमधील दोन लाख ५६ हजार ४५७ रुपयांची रोकड बँकेत जमा करण्यासाठी जात होते. ते दळवीनगर पुलावर एका गरीब महिलेस दहा रुपये देण्यासाठी थांबले.असताना ही घटना घडली.
दोन दुचाकीवरून चार आरोपी आले आणि त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून रोकड लांबविली. ही घटना गुरुवारी (दि. १६) रोजी सकाळी सव्वानऊच्या सुमारास दळवीनगर पुलावर घडली.
याबाबत सुहास पांडुरंग मोहिते (प्राधिकरण निगडी) यांनी या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जावेद इद्रिस शेख (वय १९), मोहम्मद मुर्तुजा आकसापुरे (वय २२), दीपक कालिदास तेलंग (वय २२), विजय लहू शिंदे (वय १९) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. निगडी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.











