- कंपनीच्या मॅनेजरवर रॉडने हल्ला; गाडीच्या काचा फोडल्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. २७ फेब्रुवारी २०२५) :- भारत टेक्नो प्लॉस्ट प्रा. ली कंपनी, खराबवाडी या कंपनीतील क्वालीटी मॅनेजर कंपनीतुन घरी जाणेसाठी निघाले होते. कंपनीपासून १०० मिटर अंतरावर त्यांची टाटा पंच गाडी असतांना मोटर सायकलवर वरून आलेला आरोपी क्र.२ याने त्यांची गाडी अडवली. शिवीगाळ करून हातातील लोखंडी रॉड गाडी समोरील काचेवर मारला.
तसेच पाठीमागून कंपनीत काम करणारे कामगार गाडीच्या दिशेने पळत आले. त्यांनी हातातील रॉड व लाकडी काठयांनी गाडीच्या सर्व काचा फोडल्या. गाडीचे नुकसान केली. आरोपी क्र.३ याने बिअरची बाटली गाडीवर फेकूण मारली. आरोपी क्र.४ याने लोखंडी रॉड त्यांच्या उजव्या बाजूस मानेवर मारला. त्यामूळे त्यांना मुका मार लागला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. २५) रोजी सायंकाळी ७.०० वा चे सुमारास भारत टेक्नो प्लॉस्ट कंपनी समोर १०० मिटर अंतरावर खराबवाडी येथे घडला. फिर्यादी अंकुर दिवाकर कुलकर्णी (वय ४२ वर्षे, मॅनेजर) यांनी आरोपी १. गौरव अन्नु पटेल, २ अजय राम सुशिल पटेल, ३. संदिप अशोक सोनकर, विकास राममिलन सोनकर, हर्षद विलास चौधरी, ६) रोहीत पटेल यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे.
याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी क्र.१ ते ५ यांना अटक केली आहे. पोउपनि काळे पुढील तपास करीत आहेत.