न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२५) :- थेरगाव येथील मोकळया शेतामध्ये आठ जण रम्मी नावाचा जुगार पैसे लावून खेळत होते. काळेवाडी पोलिसांनी कारवाई करून जुगारातील पत्ते व रोख रक्कम मोबाईल फोन आणि जुगारचे इतर साधन जप्त केले.
याप्रकरणी रमेश रामनाथ खेडकर पोशि/२९७५ यांनी आरोपी १) अतुल नामदेव दंडे, २) सचिन सुधाकर कोळी, ३) रज्जाक बादशहा शेख, ४) नरेंद्र मदनलाल सुराणा, ५) सत्यवान सुलतान बोहत, ६) राजन चंदर पाल, ७) सुर्यकांत जगन्नाथ कदम, ८) प्रल्हाद लिंगप्पा जवळे यांच्या विरोधात काळेवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोउपनि सुर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.















