न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२५) :- ‘ड’ आणि ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या विकास आराखड्यातील विकसित केलेल्या रस्त्यावरील करायाचे वृक्षारोपण आणि दुभाजकामधील वृक्षारोपण या देखभाल दुरुस्ती कामांची अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी पाहणी केली. पादचारी नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी रस्त्याच्या बाजुला असणारे पादचारी मार्गावर अतिक्रमण होऊ देऊ नका, रस्ता दुभाजकाची स्थिती चांगली ठेवा, रस्ता दुभाजकांमध्ये लावण्यात आलेल्या झाडांची देखभाल करा, अशा सूचनाही अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी संबंधित विभागांना दिल्या.
पाटील यांनी ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या वाकड येथील उत्कर्ष चौक, पिंक सीटी, कावेरीनगर पोलीस लाईन तसेच ‘ब’ क्षेत्रीय कार्यलयांतर्गत येणाऱ्या गुजरनगर, चिंचवडे चौक, बिर्ला हॉस्पिटल, आकुर्डी येथील रस्ता दुभाजक व पादचारी मार्ग कामाची पाहणी केली.
याप्रसंगी उद्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता देवन्ना गट्टूवार, उद्यान अधिक्षक राजेंद्र वसावे, उद्यान
विभागाचे पर्यवेक्षक यांच्यासह उद्यान व स्थापत्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.











