न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दिल्ली (दि. २० मे २०१९) :- लोकसभा निवडणुकीतील सातही टप्प्यातील मतदान पूर्ण होताच एक्झिट पोल जाहीर झाले असून देशात पुन्हा एकदा मोदी सरकारच सत्तेवर येणार, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या जागा २०१४ पेक्षा वाढतील, असा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी पंतप्रधानपदावर विराजमान होण्याचे त्यांचे स्वप्न यंदा तरी पूर्ण होणार नाही, असे एक्झिट पोलमध्ये दिसते.
नरेंद्र मोदींची पुन्हा सत्ता येणार का, भाजपा बहुमताचा आकडा गाठणार का, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कशी कामगिरी करणार, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यात काय होणार, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या महाआघाडीला जनता पाठिंबा देणार का, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या एक्झिट पोलमध्ये करण्यात आला.
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या महाआघाडीने भाजपासमोर चांगले आव्हान निर्माण केल्याचे दिसते. तर गुजरात, दिल्ली या राज्यांमध्ये भाजपाचे वर्चस्व कायम राहणार, असा अंदाज आहे. पश्चिम बंगालमध्येही भाजपाने तृणमूल काँग्रेससमोर आव्हान निर्माण केल्याचे एक्झिट पोलमधून समोर येते.
प्रमुख एक्झिट पोलचा अंदाज
> टाइम्स नाऊ – व्हीएमआर: एनडीए – ३०६, यूपीए- १३२, अन्य – १०४
> इंडिया न्यूज – एनडीए- २९८, यूपीए- ११८, अन्य – १२७
> रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीने दोन एक्झिट पोल केले आहेत. यातील एक एक्झिट पोल सीव्होटर तर दुसरा एक्झिट पोल ‘जन की बात’ चा आहे.
रिपब्लिक टीव्ही- सीव्होटर : एनडीए- २८७, यूपीए – १२८, अन्य – १२७
रिपब्लिक टीव्ही – जन की बात: एनडीए- ३०५, यूपीए- १२४, अन्य – ८७
> एनडीटीव्ही: एनडीए- ३००, यूपीए- १२७, अन्य – ११५
> आयएएनएस- सी व्होटर: भाजपा- २३६, काँग्रेस – ८०
एनडीए- २८७
> नेता- न्यूज एक्स: एनडीए- २४२, यूपीए – १६४, अन्य – १३६
> न्यूज १८ : एनडीए- २९२- ३१२, यूपीए – ६२- ७२
> एबीपी – नेल्सन : एनडीए – २६७, यूपीए – १२७, अन्य १४८ (भाजपा – २१८, काँग्रेस ८१)
> टुडेज चाणक्य: एनडीए- ३५०, यूपीए- ९५, अन्य ९७ (भाजपा – ३००, काँग्रेस- ५५)















