न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२५) :- महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक २० येथील हुतात्मा विजय साळसकर मार्गावर गुडविल चौक आहे.
या चौकाजवळ असणारी सार्वजनिक जागा कचरायुक्त झाली होती. ती जागा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून कचऱ्यातील टाकाऊ वस्तूंचा वापर करून कल्पकतेने सजवण्यात आली असून ती कचरामुक्त करण्यात आली आहे.
या परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले असून त्यासाठी टायर, तुटलेले पाईप, प्लास्टिक बॉटल्स, दगड इत्यादी वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. त्याच बरोबर येथील दगडांना विविध रंग देण्यात आल्याने हा परिसर लक्षवेधी ठरत आहे. नागरिक देखील आरोग्य विभागाच्या या कामाबाबत समाधान व्यक्त करीत आहेत.














