न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२५) :- पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या २०२५ ते २७ या दोन वर्षांसाठी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. महासंघाच्या अध्यक्षपदी कासारवाडी (पुणे) येथील श्रेयस पगारिया यांची, तर विजय भिलवडे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
महामंत्रिपदी संदीप फुलफगर, कोषाध्यक्ष म्हणून नेनसुख मांडोत यांची एकमताने निवड झाली. इतर कार्यकारणी सदस्यांचीही निवड करण्यात आली.
वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप भन्साळी, प्रकाश गदिया, दिलीप चोरडिया, उपाध्यक्षपदी प्रकाश भंडारी, श्रेणिक मंडलेचा, शांतिनाथ पाटील, संजय खाबिया, सह कोषाध्यक्ष तुषार मुथा, मंत्री वीरेश छाजेड, सुरगोंडा पाटील, प्रचार प्रसिद्धी प्रमुख संदेश गदिया, धीरज नहार यांच्यासह सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.














