न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२५) :- महाराष्ट्र राज्य विधनामंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु झाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेसंदर्भातील उपस्थित झालेल्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी आणि समन्वय साधण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर आणि शहर अभियंता मकरंद निकम यांची नेमणूक केली आहे.
सहायक समन्वयक म्हणून सहायक आयुक्त किरणकुमार मोरे व उपअभियंता सूर्यकांत मोहिते यांची नेमणूक करण्यात आली आहे.
अधिवेशनात तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, स्थगन प्रस्ताव व इतर प्रश्न विधानमंडळ सचिवालयाकडून महापालिकेस प्राप्त होतात. त्यानुसार विधिमंडळाचे कामकाज प्राधान्याने व विहित कालावधीत पार पाडणे आवश्यक आहे.
या अधिवेशनाच्या कामकाजासाठी महापालिकेने समन्वय अधिकारी व सहायक समन्वय अधिकारी नेमले आहेत. अतिरिक्त आयुक्त इंदलकर हे प्रशासकीय विषयक कामकाज तर, शहर अभियंता निकम हे अभियांत्रिकीविषयक कामकाज पाहणार आहेत.











