न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२५) :- ‘बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाधिकार’ आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. कागदपत्रांची पडताळणी मुदत १० मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. आरटीईअंतर्गत आत्तापर्यंत १ हजार ७७० जागांवर प्रवेश झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आरटीईच्या एकूण ३४३५ जागा उपलब्ध आहेत. आकुर्डी उन्नत केंद्रामध्ये २२९२ पैकी ११९३ प्रवेश झाले आहेत. तर पिंपरी उन्नत केंद्रामध्ये ११४३ पैकी ५७७ प्रवेश झाले आहेत. एकूण जागांच्या १ हजार ७७० प्रवेश झाले असून १६६५ जागा शिल्लक आहेत.
प्रवेश अर्जासाठी १० मार्चपर्यंत मुदत देण्यात आली असून रविवार सुटीचा दिवस असल्याने पालकांकडे त्यासाठी केवळ तीनच दिवस राहिले आहेत. उन्हाचा तडाखा आणि इतर कारणांमुळे ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी पालकांनी मागणी केली आहे.











