न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२५) :- मालमत्ता व पाणीपट्टी कर भरण्यासाठी, ऑनलाइन कर न भरणाऱ्या नागरिकांसाठी व यात्रा काळातील प्रलंबित कामांकरीता दिनांक ३१ मार्च अखेरपर्यंत देहू नगरपंचायतीचे कार्यालय शनिवारी कार्यालयीन वेळेत आणि रविवारी एक वाजेपर्यंत सुरू असणार आहे.
आता नागरिक शनिवार, रविवारी देखील कर भरणा करू शकतात. कर वसुली वाढविण्यासाठी शहरातील थकबाकीदारांनी कर भरावा, असे आवाहन नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी केले आहे.
देहू नगरपंचायतीकडून मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्यासाठी ऑनलाइन बिले वाटप करण्यात आली होती. वेळेत कर भरणाऱ्या नागरिकांना एक टक्का सवलत आणि लकी ड्रॉ द्वारे गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. मात्र अद्याप काही नागरिकांनी मागील थकबाकी भरलेली नाही. अशा नागरिकांना वारंवार सूचना, नोटीस बजावू…











