न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२५) :-घाटकोपर येथे एका कार्यक्रमात बोलताना भय्याजी जोशी यांनी मुंबईच्या विविधतेतील एकतेवर भाष्य केले होते. त्याचे पडसाद आज पिंपरी चिंचवड शहरात उमटले.
पिंपरी चिंचवड शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शुक्रवारी सकाळी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भय्याजी जोशी यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
यावेळी पक्षाचे शहरप्रमुख संजोग वाघेरे पाटील, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, शहर संघटिका अनिता तुतारे, युवा सेना अध्यक्ष चेतन पवार, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, उपजिल्हा प्रमुख हाजी मणियार, उपशहरप्रमुख हरेश नखाते, पिंपरी विधानसभा प्रमुख तुषार नवले, माजी नगरसेविका मीनल यादव, विशाल नाचपल्ले, यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी, शिवदूत, शिवसेना संलग्न विविध संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











