न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२५) :- पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असणारे विविध विषय प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. या स्थायी समिती सभेत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह संबंधित विभागांचे विभाग प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
केशवनगर, चिंचवड येथील विद्युत दाहिनीची ३ वर्षासाठी देखभाल दुरुस्ती करणे, महापालिकेच्या सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयाच्या स्वच्छता आणि देखभाल दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देणे, महापालिकेच्या प्रभाग क्र. २६ येथील कस्पटेवस्ती, कावेरीनगर, वेणूनगर व इतर परिसरातील रस्ते डब्ल्यूएमएम आणि एमपीएम या पद्धतीने विकसित करण्याच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
महापालिकेचा पिंपरी येथील प्रभाग क्र. २१ येथील फूटपाथ, पावसाळी गटर्स व नाल्यांची दुरुस्ती करणे, प्रभाग क्र. १० छत्रपती संभाजीनगर येथील साई उद्यानासाठी टेन्साईल रुफिंग करणे आणि स्थापत्य विषयक कामे करणे, प्रभाग क्र १ मधील शाळा परिसरातील अंतर्गत रस्त्यांची आकस्मिक देखभाल दुरुस्ती करण्याच्या विषयासह प्रभाग क्र. १३ मध्ये अमृतानंदमयी मठ परिसरात विविध ठिकाणी रस्त्याचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे, प्रभाग क्र. ११ मधील समृध्दी पार्क व शरदनगर परिसरातील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती आणि डांबरीकरण करणे, क क्षेत्रीय कार्यालयात क्रीडा विभागाकडील स्थापत्य विषयक आवश्यक कामे करण्याच्या विषयासह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती सभेत मान्यता दिली.
शहरातील वापरात नसलेले किंवा दुरावस्थेत अथवा मोडकीस अवस्थेत असणारे सार्वजनिक व सामुदायिक शौचालयाचा सर्व्हे करुन निष्कासित करण्याच्या विषयास महापालिका सभेत प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

















