न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विषय समित्यांचा एक वर्षांचा कालावधी बुधवारी (दि. ८) रोजी संपल्याने त्या बरखास्त करण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या विधी, महिला व बाल कल्याण, शहर सुधारणा, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सदस्यांचा एका वर्षांचा कालावधी संपला आहे. नव्या सदस्यांच्या निवडी आज सोमवार (दि. २०) रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आल्या. नगरसेवकांच्या संख्याबळानुसार भाजपचे ५, राष्ट्रवादीचे ३ व शिवसेनेच्या एका नगरसेवकास समितीवर संधी मिळाली. महापौर राहुल जाधत सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
विधी समिती सदस्य :-
भाजप :- माई ढोरे, अनुराधा गोरखे, अश्विनी बोबडे, कमल घोलप आणि मनिषा पवार
राष्ट्रवादी काँग्रेस :- उषा वाघेरे, सुलक्षणा धर आणि उषा काळे
शिवसेना :- प्रमोद कुटे
शहर सुधारणा समिती :-
भाजप :- आशा धायगुडे-शेंडगे, सुनीता तापकीर, कैलास बारणे, राजेंद्र लांडगे, लक्ष्मण सस्ते
राष्ट्रवादी काँग्रेस :- वैशाली घोडेकर, संतोष कोकणे आणि संजय वाबळे
शिवसेना :- रेखा दर्शले
महिला व बालकल्याण समिती :-
भाजप :- भीमाबाई फुगे, निर्मला कुटे, साधना मळेकर, उषा मुंढे, सुजाता पलांडे
राष्ट्रवादी काँग्रेस :- सुमन पवळे, निकिता कदम, अनुराधा गोफणे
शिवसेना :- अश्विनी चिंचवडे
कला, साहित्य व सांस्कृतिक समिती :-
भाजप :- तुषार हिंगे, अभिषेक बारणे, बाबा त्रिभुवन, विकास डोळस, सागर गवळी
राष्ट्रवादी काँग्रेस :- विनोद नढे, राजू मिसाळ, अपर्णा डोके
शिवसेना :- निलेश बारणे















